Ambilwade family made Gomay Rakhya an alternative to Chinese Rakhya  
नागपूर

चिनी नकोच, रक्षाबंधनासाठी तयार केल्या खास या राख्या... 

मनीषा मोहोड

नागपूर : देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतात रक्षाबंधनासाठी मोठ्या प्रमाणात चिनी राख्यांना मागणी असते. परंतु भारत-चीन सीमेवर सुरू असल्याच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिनी वस्तू नकोच असा भारतीयांचा सूर आहे. त्यामुळे चिनी राख्यांना पर्याय म्हणून नागपुरातील अंबिलवादे कुटुंबीयांनी स्वदेशी राख्यांची निर्मिती केली आहे. 

या स्वदेशी राख्यांना पुणे, मुंबईसह गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामिनी नीलेश अंबिलवादे यांनी याबाबत माहिती दिली. लॉकडाऊन काळात कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित येऊन शेणापासून राख्या तयार करण्याचे काम सुरू केले. सुरुवातील शेणापासून राख्या कशा तयार होऊ शकतील, हा मोठा प्रश्‍न होता. त्यानंतर शेणाचा बेस देऊन त्यावर कागदी आणि कापडी फुलांची आकर्षक कलाकुसर करून, सुबक स्वदेशी गोमय राख्यांची निर्मिती करण्यात आली. अंबिलवादे कुटुंबाने संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात शेण व गोमुत्रापासून अनेक कलात्मक वस्तूंची निर्मिती केली आहे. 

राख्यांसह बांगड्या आणि जपमाळही 

रक्षाबंधनात बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्या ही यावर्षीची महत्त्वाची निर्मिती. पंचगव्यापासून निर्मित या राख्यांना यामिनी यांनी कापड व कागदाच्या फुलांनी सजवून अतिशय आकर्षक रूप दिले आहे. त्यांचा मुलगा आदर्श याचाही यात मोठा सहभाग आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासह पर्यावरणाच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे यामिनी यांनी सांगितले. याशिवाय पंचगव्यापासून जपमाळा, बांगड्या, हातांचे कडे, कानातील झुमके, मोतीहार आणि आकर्षक ब्रेसलेटही त्यांनी तयार केल्या आहेत. 

आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक 

देशी गायीच्या शेणापासून तयार झालेल्या या गोमय राख्यांमध्ये पंचगव्य आणि शेणाचे मिश्रण आहे. त्यावर सर्व नैसर्गिक वस्तूंचा वापर केला आहे. मनुष्याच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम राखी हातावर बांधल्यानंतर होणार आहे. राखी जुणी झाल्यावर तिला फेकून न देता, झाडांच्या मुळाशी टाकली की, ती शेणखताचेही काम करेल. अशाप्रकारे एका राखीचे अनेक उपयोग होतील. 

 
आठ हजार राख्यांची ऑर्डर 
लॉकडाऊनमध्ये नवीन काय करावे या विचारातून गोमय राखीची निर्मिती झाली. शेणापासून राखी तयार करताना शेणासह वॉटर कलर, कपड्याचे व कागदांची फुले आणि रेशीम दोरीचा वापर केला आहे. या राख्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 8 हजार राख्यांची ऑर्डर आम्हाला मिळाली आहे.
यामिनी अंबिलवादे, नागपूर 

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Protest : आमदार यड्रावकरांनंतर आता आवाडेंच्या साखर कारखान्याची ऊस वाहतूक अडवली; स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक

Tulsi Ganesha Curse Story: तुळशी मातेला श्रीगणेशाने का दिला होता श्राप? जाणून घ्या पौराणिक कथा

Latest Marathi News Live Update : नाशिक-चांदवड पुलाचा भराव गेला वाहून, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT